जीर्णशीर्ण हवेलीतला मार्क्सवादी!
संसदेच्या कॉरीडॉर किंवा प्रांगणात अनोळखी असणाऱ्याने जरी अभिवादन केले तरी आवर्जून सस्मित प्रतिसाद देण्याचा सुसंस्कृतपणा जपणारे तसेच आपण कोणी तरी बडे राजकीय आसामी आहोत याचा मागमूसही न लागू देता दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळात सहजपणे वावरणारे सीताराम येचुरी आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणजे ‘सेनापती’ झाले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, जनाधार गमावल्याने सध्या अत्यंत हालाखीच्या अवस्थेत …